Wednesday, December 29, 2010

अभ्यास अभ्यास

अभ्यास अभ्यास .......रोज रोज अभ्यास ........
आई आणि बाबांना पडलाय एकच ध्यास........
सारखा सारखा अभ्यास नकोसे वाटते ........
नाही केला एक दिवस तर काय मोठे बिघडते ?????

मलाही खूप खूप खेळावेसे वाटतंय ......
अभ्यासाला बुट्टी मारून लोळावेसे वाटतंय ......
कोपर्यावरचा वडापाव चापावासा वाटतोय .....
मस्तपैकी सिनेमा बघावासा वाटतोय .........

दादा झाला एन्जिनिएर,ताई होईल डॉक्टर ......
खर खर सांगू ?मला व्हायचंय actor .........
वेगळी वाट चालायची इच्छा आहे माझी ....
पण आई बाबांचे डोळे पाहून स्वप्न थिजतात माझी ............

८० टक्के पडले कि ९० टक्के पडले ..............
यांच्या मात्र अपेक्षांचे ओझे फारच वाढले ...........
ओझ्यापाई ,खांदा वाकून गेलाय माझा ..........
स्वप्नांच्या पंखाला तर नाहीच उरली जागा ......

मोठ्यांच्या या इच्छ्ये पायी भरडून निघतंय मन ........
कधीतरी वाटते नको नको हे जीवन ..............
एवढी मुले करतात .....करावा का ट्राय........
आपणही आत्महत्येचा निवडावा का पर्याय ????????

एक क्षण असा आला वाटले आता सुटले ............
अभ्यासाच्या जाचातून सुटका होईल हे पटले ...........

केला मी निश्चय,ठरवला प्लान.........
मदतीसाठी निवडला गरगरणारा फ्यान ...............
बांधायला त्याला हवी होती साडी ............
आईच्या कपाटातून उचलली एक घडी ............

नजरेला दिसला आई बाबांचा हसरा फोटो ............
शप्पथ सांगते नाही सांगत खोटं..........
आई बाबांच्या डोळ्यात पहिली मी माया ......
खूप केलाय माझ्यासाठी जाईल कि हो वाया .......

Flashback झाला ,आठवले सारे .........
क्षणभर डोळ्यासमोर चमकलेच तारे ...............
आठवले प्रेम आठवला स्पर्ष्य............
डोळ्यामध्ये त्यांच्या पहिला मी हर्ष ............

माझे यश बघण्यासाठी कणकण झीज्लेत ...........
किती किती घाव मनावर सोस्ल्येत .............
क्षणात उमगली माझी मला भूल .............
याच का सव्स्कारांचा बांधलाय त्यांनी पूल ............

पटकन उठले नि धावत सुटले .............
आईच्या कमरेला मारली मिठी ..............
नजरेच्या कोपऱ्यात दिसले बाबा .............
अन डोळ्यांतून अश्रूंचा वाहिला धबधबा ..........

दोघांनीही प्रेमानी घेतले मला जवळ .............
पळूनच गेले माझ्या मनातील मळभ ...........
वचन दिले स्वत्हालाच होणार मी मोठी ...............
मीच तर आहे यांची म्हातारपणीची काठी ............................

1 comment:

  1. हि कविता मला खूप आवडली, अगदी मनाच्या कोपऱ्यात घर करून गेलीय.
    वाचल्यावर वाटलं कि खरंच कितीतरी लोकं या अवस्थेतून जात असतील नाही. पण खरंच खूप हृदयस्पर्शी आहे. धन्यवाद, अश्याच कविता वाचायला मिळू द्या.

    ReplyDelete