Wednesday, December 29, 2010

कोड पडलय मला

कोड पडलय मला सोडवाल का कुणी ?
माणसं अशी का वागतात ,शोधाल का कुणी ?

आयुष्याच्या नव्या वळणावर ,नवे लोक भेटतात
जन्मोजन्मीचा ऋणानुबंध ,असा जीव लावतात ,

मात्र एखाद्या क्षणी सहज सहज विसरतात ,
रक्ताचे तर नाही,म्हणून कवडीमोल ठरवतात ,

गरज म्हणून नात जोडतात का कुणी ?
सोय म्हणून सहज तोडतात का कुणी ?

विश्वास आणि प्रेम,नसते मागणे काही ,
समाधानाच्या तराजूत व्यवहार मात्र नाही ,

मिळेल तितके द्यावे,नि जमेल तितके घ्यावे ,
दिले घेतले सरेल ,तेव्हा ओंजळीत काय राहावे ?

नात हे ओझ नाही ,मनापासून समजून घे ,
भावनांचे मोल आणि समाधान उमजून घे ,

मैत्री नि प्रेम हळुवार नि तरल ,जपले नाही जीव लाऊन
तर होत जाईल विरळ ........श्वासाचे अंतर नि हृदयाचे स्पंदन ,
ओंजळीतली वाळू जणू सहज जाईल गळून ...........
मीना

No comments:

Post a Comment