Wednesday, December 29, 2010

तक्रार मात्र नाही

 तुझ्या नव्या सवालाने ,शब्द वळावयास लागले ...........
  सारे छुपे अर्थ ,नव्याने कळावयास लागले ............
  नको करूस मला आता नवा सवाल ............
  जुनेच माझे प्रश्न ,मला छयलावयास लागले .............  
 
  वरवर पाहता वागणे माझे साधेच होते ...........
  खोलवर जाशील तर छुपे अर्थ दडले होते ............
  जपून मनात माझ्या,माझेच आश्रू दाटले होते ........
  लपवून हुंदक्यांना दिलखुलास हासत होते ...........

  खुला आसमंत तुझा,वारा सुसाट भरला होता ...............
  दिल्या घेतल्या वचनांचा,मला लगाम पडला होता ..............
  आणा भाका,शपथा नि नाती ,
  मी मात्र जपावे आभास किती ......................
.
  नाही तुझी सोबत,नाही माया ...........
  एकाकी हा पांगळा प्रवास किती ...........
  भव्य दिव्य स्वप्नांचे कधीच नव्हते मागणे .................
  प्रश्नालाही प्रश्न पडावा,असे नशिबी भोगणे ...............

  हे दुख नेहेमीचे,झाले जुनेपुराणे .................
  चढवुनी नवे मुखवटे,गाते नवे तराणे.................
  झाला उशीर जेव्हा,हाका तुला दिल्या मी ................
  सांजवेळ झाली आता,पहाटेच पुकारले मी ..................

  मी एकटीच माझी असते कधी कधीही ..............
  गर्दीत भोवतीच्या,नसते कधी कधी मी .....................
  जपते मनात माझ्या हळुवार हुंदका हा .................
  लपवून आसवांना हसते कधी कधी मी ...............
.
  तू भेटलास जेव्हा,मी बोललेच नाही .................
  झाला उशीर आता ,तक्रार मात्र नाही ................
                            तक्रार मात्र नाही ..................... 
                                                                     मीना

No comments:

Post a Comment