Sunday, January 16, 2011

एक दिवस डोळे उघडून ..

निसर्ग नाही करत तुलना
माणसेच का करतात ........
तो देतो भरभरून ...........
हे मात्र विसरतात .............

झाडाचा मोहोर पाहून ..
बुंधा  कधी रुसत नाही ........
फुललेल्या फुलाकडे पाहून ......
कळी कधी सुकत नाही ........

ज्याचे त्याचे प्राक्तन असते ........
आभाळ अथवा माती .............
चिडणे ,रुसणे ,रागावणे .............
कुणी कुणा वरती ??????

एक  दिवस डोळे उघडून .......
पहिले अवती भोवती ...........
ओठ मिटून निमूट राहणारे ..........
दिसले सभोवती .............

राजेशाही हवेलीत राहणारे
म्हणतात नाही सुखी ..........
रस्त्यावरती टेकून माथा
म्हणतो तो, मी तर नाही दुखी .....

पैसा आहे ,वेळ आहे ,कशात नाही कमी
सांजवेळी संगतीला असतील का मुलेबाळे .........
विचार करून दमले...........
द्याल का हो हमी ????

दिसतो एखादा सुंदर चेहेरा ..............
अश्रू लपवून .........हसताना ........
इथे तिथे भेटतात सारे ..........
मुखवटे आपले ........सांभाळताना .......

काळ्या काळ्या रात्रीचे ........
साम्राज्य असते सारे ............
आकाशात मात्र विहरतात..........
झगमगणारे ....तारे ..........

धरती नि आकाशालाही हेच नियम प्यारे ........
माणूस मात्र क्षणो क्षणी करतो ....हायरे .....हायरे

निसर्गाचे असो ,वा असो प्राक्तनाचे .........
ज्याचे त्याने वहावे..............
आपल्या पाठीवरचे ओझे ............

हसणारे मिळतील .......हजार .........
रडणारा मात्र .......शोधा....कोणी .......
आपणच आपल्या वहायच्या..........
आपापला पाठी वरच्या गोणी...............

Monday, January 3, 2011

माझी कविता

नियमांच्या चौकटीत कविता माझी अडणार नाही ..........
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार नाही .....................
तुम्ही खुशाल तोला शब्दांची खोली ................
मन मात्र मी तोलणार नाही ........शब्दांच्या या आवेगाला व्याकरणात बांधणार नाही ..............

सोबतीला नाही कोणी म्हणून ,जगणे मी सोडणार नाही ........
बदलले दिवस तरी ,नशिबावर खापर फोडणार नाही ...........
आहे उद्याची आस जरी, आजला मी विसरणार नाही ..... .......
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार  नाही .......

शब्द हे मोती जणू ,कशीही माळ गुंफणार नाही .........
एकेक शब्द ओळी होताना अर्थ त्याचा सांडणार नाही .........
नसेल तुझी साथ जरी आठवणी दूर लोटणार नाही ...........
मनाच्या गाभार्यातली  कुजबुज हि थांबवणार नाही ...........

हे जीवना तुला जगताना मृत्यूला मी आळवणार नाही .........
दिलेसहि तू घेशिलाही तुच ,वचन तुझे मोडणार नाही ..........
प्राक्तनाच्या  दानापाई ओंजळ माझी सांडणार नाही ..........
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार  नाही .......................

दिवस माझा रात्रही माझी,आजही माझा कालही माझा ...........
हिशोब त्याचा मांडणार नाही उद्या काय या भीतीपोटी आज हातून ओघळणार नाही 
सुख आणि दुक्ख यांच्या तराजुला झुकते माप मी देणार नाही ....................
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार  नाही ...                               

जन्मो जन्मीचा बंध नकळत पणे उलगडला

आपली मैत्री,ना रक्ताचे ना नात्याचे बंधन ...... 
ते तर आहे आभाळाचे एक स्वप्नरंजन ........
नवरत्नांच्या हारामधले एक अनमोल रत्न ........
डवरलेल्या वेलीवर बहरलेले एक नाजूक फुल .......
जणू मनाची मनाला पडलेली एक रानभूल .......
           केवळ निरागस ,निर्वाज्ज्या,स्वच्छ ...........
ना स्वार्थ ,ना मतलब ,ना हेतू ........
हा तर केवळ दोन मने जोडणारा सेतू ....
प्रेम म्हणू कि मैत्री ?नको ती शंका नको तो प्रश्न 
हा तर केवळ शब्दांचा खेळ ........
भावलाय मला हा भावनांचा भावनांशी मेल.....
तुझ्यासाठी जे वाटतंय ते प्रेमापेक्षाही जास्त आहे ........
शब्दात मांडण्यासाठी प्रमाण त्याचे व्यस्त आहे .........
काय आहे तुझे प्रेम ?इतके प्रेरक कि सरळ ,साधे आयुष हि झाले आहे दिल्खेच्च्क .........
            हजारो माणसे असतात सभोवती ,
पण तुझा चेहेरा आपलासा वाटतो .....
बोलण्यासाठी सगळे असतात ,पण मन मात्र 
तुझ्यापाशी मोकळे होत ......  
मनाची तर काय सांगू कथा ,वेडे खूप खूप हळवे ,
तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे ........
जुने ,नवे स्पर्श तर होतात वरवर ,
का तुझ्या सहवासाची ओढ लागल्ये खोलवर ?
         मनाचा तळ गाठायला मन माझे आसुसले ....
शोध शोध शोधले मनभर भिरभिरले ......
एक हळव्या क्षणी तर्कालाही त्याचा सूर गवसला ...........
आणि जन्मो जन्मीचा बंध नकळत पणे उलगडला ..............

तुझी भेट

तुझ्या एका भेटीच्या
स्वप्नात मी दंगले
भास नि आभासांच्या
खेळात मी रमले ....

अनुभवायचे होते मला माझेच भास
तुझ्या श्वासांतील.......माझे श्वास

आतुर होते पाहायला
तुझ्या डोळ्यातील भाव
शोधत होते त्यात ........
मी माझेच नाव....

ऐकण्यासाठी तुला
लागली मला हुरहूर
शोधत होते त्यात
अंतरातले मधुर सूर ........

तुला पहाणे,तुला ऐकणे ........
तुला अनुभवणे ............
तुझ्या भेटीसाठी ........
होते सारे बहाणे ..........

पण हाय रे देवा .
झाली नाही भेट ........
यालाच का म्हणतात
योगायोग थेट ..............

कागदावर कागद नासले........
पण अर्थ नाही गवसला ......
शब्दांच्या मागे धावले .......
पण भाव नाही उमगला .........

मूर्ती बनण्यासाठी पत्थराने.......
घाव सोसला ........
देव बनण्या साठी ........
प्राण नाही ओतला ...........

हा तर जन्म माझा ......
एक देऊन गेला ........
पुढच्या जन्मीची स्वप्न
माझ्या डोळ्यात पेरून गेला   .............

मीना.