Monday, January 3, 2011

तुझी भेट

तुझ्या एका भेटीच्या
स्वप्नात मी दंगले
भास नि आभासांच्या
खेळात मी रमले ....

अनुभवायचे होते मला माझेच भास
तुझ्या श्वासांतील.......माझे श्वास

आतुर होते पाहायला
तुझ्या डोळ्यातील भाव
शोधत होते त्यात ........
मी माझेच नाव....

ऐकण्यासाठी तुला
लागली मला हुरहूर
शोधत होते त्यात
अंतरातले मधुर सूर ........

तुला पहाणे,तुला ऐकणे ........
तुला अनुभवणे ............
तुझ्या भेटीसाठी ........
होते सारे बहाणे ..........

पण हाय रे देवा .
झाली नाही भेट ........
यालाच का म्हणतात
योगायोग थेट ..............

कागदावर कागद नासले........
पण अर्थ नाही गवसला ......
शब्दांच्या मागे धावले .......
पण भाव नाही उमगला .........

मूर्ती बनण्यासाठी पत्थराने.......
घाव सोसला ........
देव बनण्या साठी ........
प्राण नाही ओतला ...........

हा तर जन्म माझा ......
एक देऊन गेला ........
पुढच्या जन्मीची स्वप्न
माझ्या डोळ्यात पेरून गेला   .............

मीना.

No comments:

Post a Comment