Sunday, January 16, 2011

एक दिवस डोळे उघडून ..

निसर्ग नाही करत तुलना
माणसेच का करतात ........
तो देतो भरभरून ...........
हे मात्र विसरतात .............

झाडाचा मोहोर पाहून ..
बुंधा  कधी रुसत नाही ........
फुललेल्या फुलाकडे पाहून ......
कळी कधी सुकत नाही ........

ज्याचे त्याचे प्राक्तन असते ........
आभाळ अथवा माती .............
चिडणे ,रुसणे ,रागावणे .............
कुणी कुणा वरती ??????

एक  दिवस डोळे उघडून .......
पहिले अवती भोवती ...........
ओठ मिटून निमूट राहणारे ..........
दिसले सभोवती .............

राजेशाही हवेलीत राहणारे
म्हणतात नाही सुखी ..........
रस्त्यावरती टेकून माथा
म्हणतो तो, मी तर नाही दुखी .....

पैसा आहे ,वेळ आहे ,कशात नाही कमी
सांजवेळी संगतीला असतील का मुलेबाळे .........
विचार करून दमले...........
द्याल का हो हमी ????

दिसतो एखादा सुंदर चेहेरा ..............
अश्रू लपवून .........हसताना ........
इथे तिथे भेटतात सारे ..........
मुखवटे आपले ........सांभाळताना .......

काळ्या काळ्या रात्रीचे ........
साम्राज्य असते सारे ............
आकाशात मात्र विहरतात..........
झगमगणारे ....तारे ..........

धरती नि आकाशालाही हेच नियम प्यारे ........
माणूस मात्र क्षणो क्षणी करतो ....हायरे .....हायरे

निसर्गाचे असो ,वा असो प्राक्तनाचे .........
ज्याचे त्याने वहावे..............
आपल्या पाठीवरचे ओझे ............

हसणारे मिळतील .......हजार .........
रडणारा मात्र .......शोधा....कोणी .......
आपणच आपल्या वहायच्या..........
आपापला पाठी वरच्या गोणी...............

No comments:

Post a Comment