Sunday, May 1, 2011

एखादी कविता जेव्हा स्फुरते ,आणि कागदावर उतरते ,त्यापूर्वी फार मोठ्या घडामोडी मानसिक पातळीवर अनुभवल्या जातात .प्रत्येक नवनिर्मिती मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो ,याच भावनिक आंदोलना ना सामोरे जावे लागते .हा अनुभव शब्दात पकडण्याचा केलेला हा एक प्रयत्न .हा प्रयत्नही मुठीत घटत धरून ठेवलेल्या वाळूसारखा आहे .........हातात आहे म्हणता म्हणता नकळतपणे निसटून जाणाऱ्या वाळूसारखा .........

                             
                                 सृजन सोहळा
         मी साक्षीदार या सृजनाची .........
        व्यक्त होऊ पाहणाऱ्या कल्पना तरंगांची
        एक अनामिक अस्वस्थता .........
        हृदयातल्या अव्यक्त भावनांची
        मिश्कील हासत समोर येणारी .........
        तर कधी ,सहजच निसटून जाणारी ....
        मऊसुत जाणीव ,जणू रेशीम लडीनची
        हा भावनांचा आवेग .....काळावे
ळाचे   भान हरपणारा........
        व्यक्त होण्यासाठी धडपडणारा   ...............
        वाऱ्याच्या वेगाने तुफान उठवणारा
        संकेत ,नियमांचा अडथ
ळा झुगारून ,,,,,,,,
        बंडखोरी करणारा ........तर कधी
        हळुवार पणे मनाला स्पर्शून जाणारा ..........
       
हृदयीच्या तारा   झंकारणारा
        मनातील रेशिमगुंता सोडवणारा ..........
        कल्पनांचे उठणारे हें तरंग ...........
        जणू ,खडकावर धडकून सागरात .....
        विलीन होणाऱ्या फेसाळणार्या लाटा
        माझीही वर्णी लागेल ,या आशेने ..........
        ताटकलणार्या  वाटा..........
        परत परत अनुभवावा ..........
        असा हा सृजनाचा सोहळा
        वास्तवाचे भान हरपून दूर दूर नेणारा ..........
        अस्वस्थतेची नशा येऊन भोवळ अणू पहाणारा...........
        पण तरीही ......मनाला स्पर्शून जाणारा
        सतारीच्या तारा
झंकारणारा ..........
        परत परत हवासा वाटणारा
        असा हा सृजनाचा सोहळा .............

मीना
२९-०४-२०११
 
      

No comments:

Post a Comment