Wednesday, August 24, 2011

कातरवेळी सायंकाळी

   कातरवेळी सायंकाळी


कातरवेळी सायंकाळी मनात उठले काहूर ...
नकळतसे कानावर आले व्हायोलिनचे करुण सूर ........
अलवार ,तरल भावनांनी मन झाले व्याकूळ .........
आर्त सुरांनी अलगद दाटे हळविशी  हुरहूर ..

निळ्या शांत या डोहावरती ही कसली चाहूल .........
खळबळ उठली व्याकुळतेची ,भेदून गेले सूर .........
सुरावटीनच्या लाटांनी या ओढून नेले दूर ..............
अवखळ ,सुसाट आठवणीनचा वाहून गेला पूर ......

दूर कुणीतरी मंजुळ ताना छेडत घाली साद ......
तटबंदी ,नि बंध रेशमी मोडून दे प्रतिसाद ..........
 दाही दिशातून ,क्षितीज भेदून  घुमुदे हा नाद .....
जगणे मोहक ,जगणे निर्मळ ,नको फुकाचा वाद ....

घन पुन्हा दाटुनी आले ,अश्रुनी भरली ओंजळ .........
निशब्द या नभांनी ,गहिवरले  डोळ्यातील काजळ ..........
कोणाची येते आठव .शपथ पुसून टाकता..........
रेशमी पदर हा जाळी,मिरवीत कथा या व्यथांच्या .........                                                  .......

कातरवेळी ,सायंकाळी मनात उठले काहूर .......
आज जीवाला हवा हवासा वाटे हा आर्त ,करून सूर ...........

मीना
२५ ऑगस्ट २०११