Wednesday, April 17, 2013

भेट

किती दिस रे लोटले .......
किती भेटी खोळंबल्या
काळाच्या प्रवाहात
किती आठवणी जपल्या .....

  आज भेट्लो जेंव्हा.....
शब्द अपुरे पडले
तुझ्या नयनी माझे
श्वास होते मिसळले.....

घेतल्या नाही आणाभाका
केली श्वासांशी सोयरिक
जसे कोसळ्ती नभ
धरित्रीवर वारेमाप.......

स्पर्शानेही स्पर्शताही
अवघा देह वितळला .....

जेंव्हा भेटलास मला ......
पंचप्राण होती गोळा
भेटीची अशी आम्ही
विणली होती चंद्रकळा

तरीही भासे अधुरी ....
मिलनाची आस ......
श्वास श्वासातून ....होतो
तुझाच आभास ........

मीना .
चालले मी वाट माझी ........तू आता अडवू नको ....
विरून गेली स्वप्न माझी ...तू आता फुलवू नको......

तोडिले जे बंध मी .....ते ,तू आता बांधू  नको .....
भावनांच्या वादळाने  .तू मला झुलवू नको ......

वादळाची ओढ माझी ........भास माझे हे पुराणे .....
वाहणाऱ्या या प्रवाहा ........हात तू देऊ नको .........

एकली हि वाट माझी .....भैरवी चे सूर हे ........
स्वप्न सोनेरी जगाची .....मज पुन्हा 
दावू नको..............


मीना ....