Monday, January 3, 2011

माझी कविता

नियमांच्या चौकटीत कविता माझी अडणार नाही ..........
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार नाही .....................
तुम्ही खुशाल तोला शब्दांची खोली ................
मन मात्र मी तोलणार नाही ........शब्दांच्या या आवेगाला व्याकरणात बांधणार नाही ..............

सोबतीला नाही कोणी म्हणून ,जगणे मी सोडणार नाही ........
बदलले दिवस तरी ,नशिबावर खापर फोडणार नाही ...........
आहे उद्याची आस जरी, आजला मी विसरणार नाही ..... .......
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार  नाही .......

शब्द हे मोती जणू ,कशीही माळ गुंफणार नाही .........
एकेक शब्द ओळी होताना अर्थ त्याचा सांडणार नाही .........
नसेल तुझी साथ जरी आठवणी दूर लोटणार नाही ...........
मनाच्या गाभार्यातली  कुजबुज हि थांबवणार नाही ...........

हे जीवना तुला जगताना मृत्यूला मी आळवणार नाही .........
दिलेसहि तू घेशिलाही तुच ,वचन तुझे मोडणार नाही ..........
प्राक्तनाच्या  दानापाई ओंजळ माझी सांडणार नाही ..........
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार  नाही .......................

दिवस माझा रात्रही माझी,आजही माझा कालही माझा ...........
हिशोब त्याचा मांडणार नाही उद्या काय या भीतीपोटी आज हातून ओघळणार नाही 
सुख आणि दुक्ख यांच्या तराजुला झुकते माप मी देणार नाही ....................
मनीचे भाव मी ओळींमध्ये मोजणार  नाही ...                               

No comments:

Post a Comment